प्राचीन संस्कृतीच्या
सर्वात मोठ्या पाऊलखुणा म्हणजे लेण्या होय. इतिहासात रमण्यासाठीचे हे एक
ठिकाण आहे. जुन्नरच्या दोनशेक लेण्यांपैकी सर्वाधिक लेण्या ह्या मनमोडीच्या
डोंगरावर आहेत. त्यांचे तीन गट पडतात. पावसाळा असो व उन्हाळा, ह्या लेण्या
तितक्याच मोहक भासत आहेत. मानवी सहवासापासून काहीश्या आडबाजूला पडलेल्या
लेण्या शांततेची अनुभूती देतात.