माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Tuesday, October 16, 2018

नारायणेश्वर, पुरंदर

हेमाडपंथी मंदिरे ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात महत्वाच्या स्थानी आहेत. शिवाची हजारो प्राचीन हेमाडपंथी मंदिरे आपल्या राज्यात पाहायला मिळतात. यातील मोठ्या प्रमाणातील मंदिरे ही उपेक्षित आहेत. एका अर्थाने हे बरंच आहे. त्यामुळे त्यांची मूळ रचना टिकून आहे आणि बाजारीकरणही झालेले नाही. अनेक मंदिरांना आधुनिक पद्धतीची रंगरंगोटी करून एकप्रकारे विद्रूपच केलं आहे. अनेक गावांत आपले मंदिर किती प्राचीन आहे, याची जाणीवही गावकऱ्यांना नाही. असेच एक मंदिर पुरंदर तालुक्यात नारायणपूर गावात आहे... ते नारायणेश्वर महादेवाचे....!!!
या मंदिरामुळे गावाला हे नाव मिळाले असले तरी, ते कशासाठी प्रसिद्ध आहे हे सर्वाना ज्ञात आहे. कधी पुरंदर किल्ल्याच्या भेटीस गेल्यास इथे नक्की भेट द्या.