देवीभोयरे या छोटयाशा
गावातील श्री अंबिका देवीचे हे पवित्र स्वयंभू स्थान जागृत देवस्थान आहे.
माहूरची श्री रेणुकामाता या ठिकाणी तादुंळाकार पाषाण मूर्तिच्या
स्वरूपात स्वयंभू प्रगट झालेली असून ती दक्षिणभिमुखी आहे. दक्षिणेकडे
मुख असलेली देवस्थाने जागृत असल्याचे मानण्यात येते. या स्थानाची
उत्त्पतीची कथा विस्मयकारक आहे.
|
||||||||||||
क्षीरसागर
हे गावातील प्रतिष्ठित ब्राम्हण घराणे. माहूरची श्री रेणुकामाता हे
त्यांचे कुलदैवत. या घराण्याचे मूळ पुरूष रेणुकामातेच्या निस्सीम
भक्तीपोटी नवरात्रामध्ये माहूरगडाची वारी नियमितपणे करीत असत. त्याकाळी
हा दूरचा प्रवास अतिशय खडतर असे. पुढे वार्धक्यामुळे त्यांना हा जिकीरीचा
प्रवास झेपेनासा झाल्यामुळे वारीचा त्यांचा नित्यनेम खंडित झाला.
त्यांमुळे अतिशय व्यथित होऊन त्यांना रेणुकामातेच्या दर्शनाची तळमळ लागून
राहिली. आणि काय आश्चर्य—श्री रेणुकामातेने सतत तीन दिवस त्यांना
स्वप्न दृष्टांत देवून ‘’मीच तुला दर्शन द्यावयास आले आहे.’’असे सांगून
विशिष्ट जागा दाखविली आणि त्या ठिकाणी खणल्यास ‘’मी प्रगट होईन’’असे
संकेत दिले. तेच हे पवित्र स्थान की जेथे स्वप्न दृष्टांतानुसार
खणल्यासनंतर श्री अंबिकेची तांदुळाकार पाषाण मूर्ति-(‘’तांदळाजमिनीमधून
म्हणजे भुयारामधून स्व यंभू प्रगट झाली. या मूर्तिभोवती हळदीकुंकवाच्या-
पेटयाही आढळून आल्या.
|
||||||||||||
या ठिकाणी
श्रीरेणुकामाता भुयारातून म्हणजे भूविवरातून प्रगट झाली म्हणून गावाला
देवीभूविवर असे नाव प्राप्त झाले. त्याचाच पुढे अपभ्रंश होऊन गावाचे नाव
'देवीभोयरे' असे रूढ झाले.
श्रीक्षेत्र देवीभोयरे श्री. अंबिकादेवी हे ठिकाण महाराष्ट्रात, अहमदनगर
जिल्हयात, पारनेर तालुक्यात आहे. पारनेर तालुक्याच्या पश्चिमेला पारनेर
पासून 18 कि. मी. वर व शिरूर पासून 24 कि.मी. अंतरावर देवीभोयरे हे क्षेत्र
आहे.
पुणे ते शिरूर, शिरुर ते कल्याण (मुंबई), नगर पारनेर देवीभोयरे इत्यादी
ठिकाणी सर्व डांबरी रस्ता आहे. पुणे मुंबईतून शिरूर कडे जाणा-या अनेक एस.
टी. बसेस आहेत. त्या सर्व देविभोयरे येथे थांबतात. तसेच अहमदनगर येथुनही
सुपे मार्गे अनेक बसेस उपलब्ध आहेत.
संदर्भ: http://www.devibhoyare.com
छायाचित्रे:
|
माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...
Monday, April 30, 2012
अंबिकादेवी देवस्थान: देवी भोयरे (जि. अहमदनगर)
लेबल्स
अंबिका देवी,
अहमदनगर जिल्हा,
देवस्थान,
देवी,
देवी भोयरे,
पारनेर तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment