चहूबाजूंनी डोंगरांच्या रांगा आणि कुठेतरी छोट्याशा खिंडीतून पलीकडे जाणारे रस्ते ओलांडत मी या जलाशयाच्या काठाशी पोहोचलो. मानवी वस्तीपासून बऱ्यापैकी दूर असणारा हा परिसर सकाळच्या वेळी खूपच शांत दिसत होता. ऐकू येत होती फक्त पक्षांची किलबिल. मध्येच वाऱ्याचा मंदसा आवाज देखील यायचा. जलाशयाच्या पाण्यामध्ये जलचर मस्ती करत होते, असं वाटत होतं. पलीकडच्या डोंगररांगातून सूर्यदेव त्या जलाशयात आपलं प्रतिबिंब न्याहाळत होता. पाणी स्थिर आणि स्थितप्रज्ञ भासत होतं. निसर्गाची अशी अद्वितीय अनुभूती फारच क्वचित वेळा पाहायला मिळते. या प्रसंगांचा अनुभव आपल्याला निसर्गाशी एकरूप करायला मदत करतो. मन:शांती मिळवण्यासाठी कुठलाही कोर्स करण्याची आवश्यकता भासत नाही. मानवी गर्दी पासून दूर निसर्गाच्या कुशीत गेलं की निसर्गलेणी आपल्याला मनःशांती मिळवून देतात.
माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...
Showing posts with label त्र्यंबकेश्वर तालुका. Show all posts
Showing posts with label त्र्यंबकेश्वर तालुका. Show all posts
Monday, July 22, 2024
Wednesday, February 9, 2022
एका अल्पावधीत ग्लॅमरस झालेल्या किल्ल्याची गोष्ट
दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. नाशकातल्या अनेक अपरिचित किल्ल्यांवर किल्ल्यांची आम्ही भ्रमंती करायला लागलो होतो. त्यातच त्र्यंबकेश्वर जवळच्या हरिहर किल्ल्याबद्दल माहिती समजली.
त्यादिवशी तिथीनुसार येणारी शिवजयंती शनिवारी आली होती. शिवाय सुट्टीचा दिवस असल्याने आम्ही अर्थात मी आणि माझ्या भावाने हरिहर किल्ला सर करण्याची योजना आखली. पहाटे पाच वाजताच आम्ही नाशिक वरून प्रस्थान केले. थंडी संपून उन्हाळ्याची सुरुवात होऊ लागली होती. परंतु वातावरणात गारवा मात्र कायम होता. त्र्यंबकेश्वर परिसरातील दुगारवाडी हा नाशिक जिल्ह्यातला एक सुप्रसिद्ध धबधबा होय. यापूर्वीच्या वर्षाऋतू मध्ये दुगारवाडीला भेट दिली होती. याच रस्त्यावर ढगांमध्ये लपाछपी खेळणारा हरिहर किल्ला पहिल्यांदा पाहिला होता. त्यामुळे त्याचे भौगोलिक स्थान माहीत होते. दुगारवाडीच्या दिशेने जाणारा हाच मार्ग चालत आम्ही हरिहरच्या दिशेने निघालो होतो. सकाळी सातच्या दरम्यान किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या हर्षेवाडी गावामध्ये आम्ही पोहोचलो. रस्त्यामध्ये कुठेच किल्ल्याच्या नावाची पाटी नव्हती. तसेच रस्ते देखील फारसे चांगले नव्हते. परंतु जंगलातील वळणावळणाचे रस्ते असल्यामुळे प्रवासाचे काही वाटले नाही. तसं पाहिलं तर हर्षवाडी एक आदिवासी गाव होतं. या भागात मानवी वस्ती तशी फार कमीच जाणवली. समोर हरिहर किल्ल्याचे सर सरळसोट पाषाण दिसत होते. कदाचित याच बाजूने वर जाण्यासाठी रस्ता असावा, असे आम्हाला वाटले. सकाळच्या वेळेस या परिसरात कुणीच नसल्यामुळे एका उजाड माळरानावर आम्ही बाईक पार्क केली. हेल्मेट कुठे ठेवायचे? हा प्रश्न होताच. त्यामुळे ते आम्ही बरोबरच घेऊन निघालो. थोडीशी मळलेली पायवाट किल्ल्याच्या दिशेने जाताना दिसली. अजूनही कोणत्याही मनुष्याचे दर्शन आम्हाला झाले नव्हते. किल्ल्याच्या दिशेने जाणारी पायवाट चालतच आम्ही मार्गक्रमण करू लागलो. दोन ते तीन ठिकाणी दगडाचे अवघड पॅचेस होते. ते पार करताना कस लागला. अखेरीस बालेकिल्ल्याच्या पायथ्यापर्यंत आम्ही जाऊन पोहोचलो. समोर पाहिले तर जवळपास ९० अंशामध्ये असणाऱ्या पायऱ्या दिसल्या आणि काळजामध्ये धस्स झाले. या पायर्या चढून जायच्या? असा प्रश्नवाचक उदगार मनात उमटला. त्या क्षणी त्या पायऱ्या अतिशय अवघड वाटत होत्या. इथपर्यंत आलो तेच खूप झाले... आता परत मागे फिरू या, असाही विचार मनामध्ये आला. परंतु थोडे पुढे गेल्यानंतर समजले की, प्रत्येक पायरीला दोन्ही बाजूंना खोबणी केलेल्या आहेत. त्यांना पकडून वरती जाणार जाता येणे शक्य होते. मग आम्ही धाडस करून त्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. इथून खाली निसटलो तर आजूबाजूला बघायला देखील कोणी नाही, हा विचारच भीतीदायक होता. परंतु हा थ्रिलींग अनुभव घ्यायचा आहे, असे आम्ही मनोमन ठरवले व पायऱ्या चढायला सुरुवात केली. एक एक करत साधारणतः पन्नास एक पायऱ्या चढत आम्ही मुख्य दरवाजापाशी पोहोचलो. किल्ले भ्रमंतीमध्ये आलेला तो आजवरचा एक रोमांचकारी अनुभव होता. दरवाजातून पुढे गेल्यावर एका कोरलेल्या कपारीतून पुढे देखील अशाच प्रकारच्या पायऱ्या तयार केलेल्या दिसल्या. आम्ही त्यादेखील तितक्याच सावधतेने हळूहळू चढत वरच्या दिशेने मार्गक्रमण केले. थोड्याच वेळामध्ये शेवटचा दरवाजा देखील दृष्टीस पडला. तो पार केल्यानंतर किल्ला सर केल्याचे समाधान प्राप्त झाले होते. किल्ल्यावर काहीच वर्दळ नव्हती. काही उघडी मंदिरे, दोन-तीन तळी व एक सर्वोच्च टोक. शिवाय एका बाजूला धान्याचे भव्य कोठार... इतकीच काय ती या किल्ल्याची संपत्ती होती! दूरवर दिसणाऱ्या धान्यकोठारांशी माकडांचा एक समूह उड्या मारताना दिसला. आमची चाहूल लागल्यामुळे त्यातली निम्मी माकडे तर निश्चित पळून गेली असावी. किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावरून खाली उतरताना एक परदेशी आणि एक भारतीय व्यक्ती किल्ला पाहायला आलेली दिसली. या दुर्गदर्शनामध्ये आम्हाला दिसलेले ते दोघेच मनुष्य प्राणी होते. त्यादिवशी एक अद्भुत आणि रोमांचकारी किल्ला बघण्याचे समाधान आम्हाला लाभले.
दहा वर्षानंतर...
मधल्या काळामध्ये पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले. या वाहून गेलेल्या पाण्यामध्ये सोशल मीडिया नावाचा घटक अतिशय वेगाने कार्यरत झाला होता. समाज माध्यमांद्वारे हळूहळू हरिहर किल्ल्याची माहिती सर्वदूर पोहोचली. अगदी हौशे, नवशे आणि गवशे ट्रेकर्स फिरण्यासाठी या किल्ल्यावर तुडुंब गर्दी करू लागले. आमच्या हरिश्चंद्रगडासारखी परिस्थिती या ठिकाणी तयार झाली. गुगलवर तुम्ही नुसते हरिहरगड जरी सर्च केले तरी शेकडो व्हिडीओ, लेख व ब्लॉग तुम्हाला दिसून येतील. इतकी लोकप्रियता या किल्ल्याने मधल्या काळात प्राप्त केली. खऱ्याखुऱ्या ट्रेकर्सपेक्षा निव्वळ हुल्लडबाजी करायला येणाऱ्या पर्यटकांची इथे अधिक गर्दी होऊ लागली. याची प्रचिती या वर्षी केलेल्या ट्रेकमध्ये आम्हाला आली.
हर्षवाडी गावामध्ये आता नव्याने टोलनाका सदृश फाटक उभारले गेले होते. तिथे पावत्या पाडण्याची देखील सुविधा करण्यात आली होती. शिवाय आम्ही सकाळी साडे सहाच्या दरम्यान या पोहोचलो. सुट्टीचा दिवस नसून देखील तोवर बऱ्याच गाड्या पार्किंगमध्ये आधीपासूनच उभ्या असलेल्या दिसल्या. त्यातील एक टेम्पो ट्रॅव्हलर दुरून कुठून तरी आलेली होती. तिच्यामध्ये असेच अतिउत्साही पर्यटक आल्याचे दिसत येत होते. किल्ल्याच्या मुख्य पायर्यांपर्यंत चढून गेलो तोवर फारशी गर्दी नव्हती. वातावरण आल्हाददायक झालेले होते. शिवाय सूर्यही बऱ्यापैकी वर आलेला होता. एकंदरितच फोटोग्राफीसाठी एक उत्तम वातावरण तयार झाले होते. तेव्हाच दहा वर्षांपूर्वीचा हरिहरगड आठवला. इथवर येईपर्यंत चार ते पाच ठिकाणी विविध खाद्यपदार्थांची दुकाने व उपहारगृहे देखील उघडलेली दिसली. शनिवार-रविवारी कदाचित इथे तुडूंब गर्दी होत असावी. आजूबाजूच्या गावकऱ्यांना रोजगाराचे नवे दालन उघडले असले तरी किल्ल्यावर प्लॅस्टिकच्या कचऱ्याची बरीच गर्दी देखील दिसून आली. आपल्या परिसरातील किल्ले आजही या प्लास्टिकच्या विळख्यात अजून वेगाने अडकत असल्याचे दिसतात. हरिहर याच दिशेने वेगाने प्रगती करताना वाटला. बालेकिल्ल्याच्या पायर्या चढायला सुरुवात केली व मध्यावर जाऊन थांबलो. तेवढ्यात किल्ल्यावरील माकडांचे आमच्यावर आक्रमण झाले. ही माकडे माणसाळल्यासारखी अतिशय जवळ येत होती. अगदी बॅगला हात लावून तिथे काही सापडते का, याची देखील चाचपणी करत होती! दहा वर्षांपूर्वी हीच माकडे आम्हाला पन्नास फुटावरून बघून पळून गेली होती. आज त्यांची बरीच उत्क्रांती झालेली दिसली! उत्साही पर्यटकांमुळे किल्ल्यांवरील माकडे माणसाळतात आणि त्याचा त्रास सर्वांनाच होतो. तशीच गत झाली होती. उतरताना देखील या माकडांनी इतर पर्यटक आणि ट्रेकर्सना बराच त्रास दिला. कोणत्या प्राण्यांना भूतदया दाखवायची? याचे प्रशिक्षण देखील मानवप्राण्याला द्यायला हवे, असे वाटून गेले. माकडांना माणसाने टाकलेल्या खाद्य पदार्थांची सवय झाल्यामुळे आता ते स्वतःचे खाद्य स्वतः शोधताना दिसत नाहीत. पायर्या चढून वर गेल्यावर मुख्य दरवाजाच्या समोरच अजून एक दुकान थाटलेले दिसले. येथून वर जाण्याचा रस्ता लवकर समजत नव्हता. किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो तोवर खालून येणाऱ्यांची बरीच गर्दी झालेली होती. शिवाय बराच आरडाओरडा देखील ऐकू येत होता. यावरूनच सुट्टीच्या दिवशी या किल्ल्यावर काय अवस्था असेल, याचा अंदाज बांधता आला. एकेकाळी अतिशय निर्जन व शांत असलेला किल्ला एक 'भयावह' पर्यटन स्थळ झालेला दिसून आला. किल्ल्याच्या माथ्यावर माकडे नसल्यामुळे यावेळेस किल्ला पूर्ण बघता आला, हे सौभाग्यच मानावे असे होते. किल्ला उतरताना विविध प्रकारच्या पर्यटकांची गर्दी दिसून आली. वर सांगितल्याप्रमाणे हौसे, नवसे आणि गवशे अशा सर्वच श्रेणीतील सो-कॉल्ड ट्रेकर्स किल्ल्यावर येत होते. हाफ चड्डी घातलेले, टाईट जीन्स घातलेले आणि थ्री-फोर्थ पॅन्ट घालून देखील ट्रेकिंग करणारे अनेक नवट्रेकर्स किल्ला चढताना दिसले. सोशल मीडिया एखाद्या किल्ल्याला किती ग्लॅमरस रुप देऊ शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण हरिहरच्या रूपाने दिसून आले. खाली येईपर्यंत हर्षेवाडी गावात देखील वाहनांची बरीच गर्दी झालेली दिसली.
यंदाच्या नाशिक दौऱ्यातील पहिल्याच किल्ल्याची भ्रमंती एका वेगळ्या दृष्टिकोनातून करता आली, त्यासाठीच हा लेखप्रपंच.

लेबल्स
girimitra,
किल्ला,
गड,
त्र्यंबकेश्वर तालुका,
दुर्ग,
नाशिक जिल्हा
Monday, December 3, 2012
त्र्यंबक गड
गोदावरीचे उगमस्थान म्हणून नाशिक जिल्ह्यातील
त्र्यंबकेश्वर ओळखले जाते. इथेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग वसलेले
आहे. त्र्यंबकेश्वर जवळच्या ब्रम्हगिरी पर्वतावर गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. या
विषयी माझ्या या ब्लॉगवर मी आधीच एक पोस्ट केलेली आहेच. परंतु, ब्रम्हगिरीचे
इतिहासात गड-किल्ला म्हणून स्थान अधोरेखित केले नव्हते. म्हणूनच ही पोस्ट करत आहे.
इ.स. १२७१ - १३०८
त्र्यंबकेश्वर किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरावर देवगिरीचा राजा रामचंद्र याच्या
भावाची राजवट होती. मोगल इतिहासकार किल्ल्याचा उल्लेख नासिक असा करतात. पुढे
किल्ला बहमनी राजवटीकडे गेला. तिथून पुढे तो अहमदनगरच्या निजामशहाकडे गेला. इ.स.
१६२९ मध्ये शहाजी राजांनी बंड करून हा किल्ला व आजूबाजूचा परिसर जिंकला. मोगल राजा
शाहजान याने ८ हजाराचे घोडदळ हा परिसर जिंकण्यासाठी पाठवले. इ.स. १६३३ मध्ये
त्रिंबक किल्ल्याचा किल्लेदार मोगलांकडे गेला. इ.स. १६३६ मध्ये शहाजी राजांचा
माहुली येथे पराभव झाल्यावर त्रिंबकगड मोगलांचा सेनापती खानजमान ह्याच्या हवाली
केला. इ.स. १६७० मध्ये शिवरायांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने त्रिंबक किल्ला
जिंकून घेतला.
इ.स. १६८७ मध्ये
मोगलांच्या अनेक ठिकाणी आक्रमक हालचाली चालू होत्या. याच सुमारास मोगलांचा अधिकारी
मातबर खान याची नासिक येथे नेमणूक झाली. १६८२ च्या सुमारास सुमारास मराठ्यांची फौज
गडाच्या भागात गेल्याने खानजहान बहाद्दरचा मुलगा मुझ्झफरखान याला मोगली फौजेत नेमण्यात
आले. याने गडाच्या पायथ्याच्या तीन वाड्या जाळून टाकल्या. १६८३ च्या फेब्रुवारी
महिन्यात राधो खोपडा हा मराठा अनामतखानाकडे जाऊन मराठयांना फितुर झाला. त्याच्यावर
बादशाही कृपा झाली, तर तो मोगलांना त्रिंबकगड मिळवून देणार होता.
या राधो खोपड्याने त्रिंबक किल्ल्याच्या किल्लेदाराला फितुर करण्याचा प्रयत्न केला, पण किल्लेदार
त्याला वश झाला नाही. तो संभाजी महाराजांशी एकनिष्ठ राहिला. राधो खोपड्याचे
कारस्थान अयशस्वी झाल्यामुळे त्याला मोघलांनी कैद केले. पुढे १६८४ मध्ये नोव्हेंबर
महिन्यात अकरमतखान आणि महमतखान यांनी त्रिंबकगडाच्या पायथ्याच्या काही वाडया
पुन्हा जाळल्या व तेथील जनावरे हस्तगत केली. १६८२ आणि १६८४ मध्ये मोगलांनी किल्ला
घेण्याचा हरप्रकारे प्रयत्न केला, पण तो फसला. इ.स. १६८८ मध्ये मोगल सरदार
मातबरखानाने ऑगस्ट महिन्यात किल्ल्याला वेढा घातला. त्याने औरंगजेबाला पत्र
पाठविले आणि त्यात तो म्हणतो, ’‘त्र्यंबकच्या किल्ल्याला
मी सहा महिन्यांपासून वेढा घातला होता किल्ल्याभोवती मी चौक्या वसविल्या आहेत. सहा
महिन्यांपासून किल्ल्यामध्ये लोकांचे येणे जाणे बंद आहे. किल्ल्यामध्ये रसदेचा
एकही दाणा पोहोचणार नाही याची व्यवस्था मी केली आहे. त्यामुळे किल्ल्यातील लोक
हवालदील होतील आणि शरण येतील’’. [संदर्भ: ट्रेक क्षितीज़.कॉम]
किल्ला
म्हणावा असे या ठिकाणी फारसे अवशेष दिसून येत नाहीत. गोदावरी
व त्र्यंबकेश्वराच्या
भाविकांच्या गर्दीमुळे या ठिकाणी बऱ्यापैकी वर्दळ दिसून येते. प्राचीन किल्ला म्हणून
या ठिकाणी फार भेटी दिल्या जात नाहीत. तसं पाहिलं तर त्र्यंबक पर्वतांची ही रांग
अत्यंत भक्कम कड्यांनी बनलेली आहे. किल्ल्यावरील परिसरही विस्तीर्ण आहे.
गडमाथ्यावरून पूर्वेकडे नाशिकचा रामशेज, भोरगड तर पश्चिमेकडे हरिहर किल्ला स्पष्ट
दिसून येतो. हरिहर व भास्करगडांची रांग त्र्यंबक उतरून पार करता येते, असे कुठेतरी
वाचलं होतं. पण वाट मात्र सापडली नाही. किल्ल्याच्या पायऱ्या ह्या कातळात
कोरलेल्या आहेत. येथुन पावसाळ्यात गड चढत जाणं म्हणजे एक प्रकारचे थ्रीलच असते! गडमाथ्यावरील
पठारावर किल्ल्यातील सैनिकांना राहण्यासाठी ज्या जागा बनविल्या गेल्या होत्या,
त्यांचे केवळ अवशेषच पाहायला मिळतात...
छायाचित्रे:
Saturday, June 23, 2012
अंजनेरी: हनुमानाचे जन्मस्थान
नाशिक आज जरी रामाच्या वास्तव्यामुळे पवित्र
झाले असले तरी इथे रामायणाचा बराच पौराणिक इतिहास आहे. रामभक्त हनुमानाचा जन्म
अंजनी मातेपोटी नाशिकजवळ अंजनेरी येथे झाला होता. अंजनेरी हा गिरीदुर्ग नाशिकपासून
२२ किलोमीटर अंतरावर आहे. नाशिकमधुन त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अंजनेरी
गाव वसलेले आहे. बसने जायचे असल्यास खालची अंजनेरी व वरची अंजनेरी असे दोन स्टॉप
आहेत. वरची अंजनेरी ही अंजनेरी दुर्गाच्या जवळ लागते.
हनुमानाच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमी
त्र्यंबकेश्वरपासून केवळ ५ ते ६ किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईकडून येणाऱ्यांसाठी हा
रस्ता सोयीचा पडेल. हनुमानाचे जन्मस्थान म्हणून परिचित असले तरी अंजनेरी हे
पर्यटकांसाठी एक मेजवानी असणारे स्थळ आहे. इथे एकंदरीत १०८ जैन लेणी आढळून येतात.
मूळ अंजनेरी गावापासून गडाकडे जाण्याकरिता एक किलोमीटर पर्यंत गडावर गाडी (दुचाकी
व चारचाकी) नेता येते. नवरा-नवरी नावाच्या दोन गडसुळक्यांपासून अंजनेरी दुर्गाकडे
रस्ता जातो. त्यासाठी दोन डोंगर पार करून जावे लागते. पहिल्या डोंगरानंतर
अंजनीमातेचे छोटेखानी मंदीर दृष्टीस पडते. तिथुन दुसरा डोंगर ओलांडल्यानंतर भव्य
पठार आहे. व शेवटी वायुपुत्र हनुमानाचे लहानसे मंदीर दृष्टीस पडते. इथवर येण्याचा
मार्ग थोडासा खडतर असल्याने मारूतीचे भव्य मंदीर बांधलेले नसावे. त्र्यंबकेश्वर
रस्त्यावरच अंजनेरी गावात भव्य सिद्ध हनुमान देवस्थानाचे मंदीर बांधलेले आहे.
बहुतांश पर्यटक व भाविक ह्या मंदीरात हनुमानाचे दर्शन घेऊनच अंजनेरी गडाच्या दर्शनासाठी
पुढे जातात. सिद्ध हनुमान देवस्थानात हनुमानाची ११ फुटी ध्यानमग्न उंच मूर्ती
दृष्टीस पडते.
अंजनेरी पहिल्या पर्वतावर
पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात.
एक डावीकडे वळते
तर दुसरी समोरच्या बालेकिल्ल्याकडे
जाते. डावीकडच्या
वाटेने वळल्यावर १५ मिनिटांतच आपण सीता गुहेपाशी येऊन पोहोचतो. दोन खोल्यांची ही गुहा आहे.
इथे १० ते १२ जणांना राहताही येते. गुहेच्या भिंतींवर अनेक शिल्पे कोरलेली दिसून येतात. समोर असणार्या वाटेने बालेकिल्ल्यावर गेल्यावर वीसच मिनिटांत
आपण दुसर्या अंजनीमातेच्या मंदिरात
पोहोचतो. हे मंदिर सुद्धा
प्रशस्त आहे. किल्ल्याचा घेरा फार मोठा आहे. किल्ल्याच्या पठारावर बाकी काही पाहण्यासारखे काही नाही. अंजनेरी गडाची भव्यता मात्र लक्षात राहुन जाते. समोरच
त्र्यंबकेश्वरचा ब्रम्हगिरी पर्वत मनात घर करुन जातो. अंजनेरी गावापासून
मंदीरापर्यंतचा प्रवास हा साधारणत: दोन तासांचा आहे. दुर्गभ्रमंती म्हणून जायचे
असल्यास अंजनेरीला भेट देण्यास हरकत नसावी.
छायाचित्रे:
![]() |
| अंजनेरी पर्वत |
![]() |
| श्री सिद्धहनुमान देवस्थान |
![]() |
| अंजनेरी गांव |
![]() |
| अंजनेरी येथील तलाव |
![]() |
| अंजनीमाता मंदीर |
![]() |
| अंजनेरी पर्वतावर पावसाळ्यात तयार होणारे तळे |
![]() |
| अंजनेरी: दोन पर्वतांमधील खिंड |
![]() |
| पर्वतावरील विस्तीर्ण परिसर |
लेबल्स
अंजनेरी,
जन्मस्थान,
त्र्यंबकेश्वर तालुका,
नाशिक जिल्हा,
पर्वत,
पावसाळा,
हनुमान
Tuesday, May 1, 2012
दक्षिण गंगेचे उगमस्थान - ब्रम्हगिरी
दक्षिणगंगा
म्हणुन ओळखली जाणारी गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते व
बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक
देवस्थान होय. येथील ब्रम्हगिरी पर्वतावर गोदावरी नदीचे उगमस्थान आहे.
सह्याद्रिच्या नयनरम्य पर्वतरांगात त्र्यंबकेश्वर वसलेले आहे. चहुबाजूंनी ब्रम्हगिरीचा
डोंगर या परीसराला लाभलेला आहे. श्रावणातील सोमवारी या ठिकाणी दरवर्षी भक्तांचा
महापूर येत असतो. ब्रम्हगिरी पर्वतावर गंगा-गोदावरीचे उगमस्थान साधारणत: ४ ते ५
किमीवर आहे. त्र्यंबकेश्वर गावातून या पर्वताच्या पायथ्यापर्यंत सहज पोहचता येते.
त्याची रचना एखाद्या किल्ल्याप्रमाणे भासते. विशेषत: जून ते डिसेंबर या कालावधीत
घनदाट हिरवळीने हा परीसर नटलेला दिसून येतो. जणू काही निसर्गाने हिरव्या रंगाची
सर्व उधळण याच परिसरात केल्याचा भासही होतो. गोदावरीच्या उगमस्थानापर्यंत जाण्याकरीता
एक पर्वत पुर्ण पार करावा लागतो. चढाईच्या वाटेवर पायऱ्या बनविल्या गेल्या
असल्याने चालण्याचा त्रास जाणवत नाही. अनेक ठिकाणी कोरुन पायऱ्यांची रचना केली अशा
जागेवरुन जाताना प्राचीन ठिकाणी भेट दिल्याचा अविष्कार नक्कीच होतो. पावसाळ्यात या
पर्वतावरील धबधबे सतत वाहत असतात. असे अनेक धबधबे या लांबलचक पर्वतावर दिसून येतात
शिवाय संततधार असल्याने पर्वताच्या वरील परिसर सतत धुक्यात असल्याचा जाणवतो. येथून
त्र्यंबकेश्वर शहराचे नयनरम्य दर्शनही घेता येते. गंगा-गोदावरीच्या ऊगमस्थानी भेट
दिल्याचा व येथील पाणी स्पर्श केल्याचा आनंद काही निराळाच असतो. प्राचीन काळी शंकराने
जटा आपटून गोदावरीला जगतकल्याणासाठी दिशा दिली, तेथे एक मंदिर बांधण्यात आलेले
आहे. शंकराच्या जटेच्या व गुडघ्यांच्या पाऊलखुणा येथे पाहता येतात. गोदावरी नदी
ब्रम्हगिरी पर्वतावरुन वाहताना प्रत्येकाने जीवनात एकदा तरी पहायलाच हवे.
छायाचित्रे:
नयनरम्य ब्रम्हगिरी पर्वत
|
धुक्यात हरविलेले गोदावरी मंदीर
|
नयनरम्य ब्रम्हगिरी पर्वत
|
नयनरम्य ब्रम्हगिरी पर्वत
|
डावीकडून: मी, विवेक पाटील, भूषण पवार
|
ब्रम्हगिरीवरून दिसणारे त्र्यंबकेश्वर शहर
|
मंदीर
|
नयनरम्य ब्रम्हगिरी पर्वत
|
नयनरम्य ब्रम्हगिरी पर्वत
|
गोदावरी मुख
|
गोदावरी मंदीर
|
गोदावरी उगम
|
Subscribe to:
Posts (Atom)

.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)