कळंब गावातून चास कडे जाणाऱ्या रस्त्यावर साधारणत: दोन किलोमीटर उजवीकडे एक
रस्ता टाकेवाडी च्या दिशेने जातो. या फाट्यावर एक छोटेखानी जंगल आहे.
विठ्ठलवाडी हे इथले गाव. जंगलातून थोडंसं पुढे गेल्यावर पहिलाच उजव्या
बाजूचा वळण घेणारा कच्चा रस्ता आहे. या रस्त्याने चार-पाच घरे लागतात यातील
शेवटचे घर हे खंडोबा टेकडीच्या पायथ्याचे घर होय. टेकडीवरच्या मंदिराची
चावी याच घरात भेटते. मी पहिल्यांदा गेलो तेव्हा त्याबद्दल माहिती नव्हती.
घरातल्या लोकांनी स्वतः मला चावी आणून दिली होती. त्याच घराच्या मागच्या
बाजूने एक छोटी पायवाट या टेकडीवर जाते. फार फार तर दहा मिनिटांमध्ये आपण
या टेकडीवर पोहोचतो. टेकडीवर जाण्याकरता मोठा रस्ता बनविण्याचा प्रयत्न
झाला असावा, असे दिसते. परंतु, अजूनही तो पूर्णतः कच्चा आहे. टेकडीवर
खंडोबाचे छोटेखानी मंदिर आहे. येथून आंबेगाव तालुक्यातला बराचसा मोठा परिसर
दृष्टीक्षेपात येतो. कळंब गाव व पुणे-नाशिक महामार्गही पूर्णपणे दिसतो.
दुपारच्या वेळेस या टेकडीवरची हवा मात्र आनंदाची झुळूक वाटावी अशीच असते.
टेकडीच्या दुसऱ्या बाजूनेही खाली उतरण्यास रस्ता आहे. स्वतःची गाडी घेऊन
गेला नसल्यास या ठिकाणावरून उतरण्यास काहीच हरकत नाही.
माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...
Showing posts with label खंडोबा. Show all posts
Showing posts with label खंडोबा. Show all posts
Wednesday, November 13, 2019
Thursday, March 21, 2019
खंडोबा मंदिर, औरंगाबाद
औरंगाबादच्या सातारा परिसरातील पेशवेकालीन हे आहे खंडोबा मंदिर. मराठा वास्तुशैलीतील हे मंदिर पूर्णतः विटांनी बांधलेले आहे. बीड बायपास रस्त्यावरून एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयापासून एक रस्ता थेट सातारा गावात येतो. याच रस्त्यावर सदर मंदिर बांधले आहे. मंदिर परिसर गर्भगृह, सभामंडप व मुख्य प्रवेशद्वार यात विभागलेला आहे. अर्धमंडपाच्या वरच्या भागात गजलक्ष्मी, शेषशायी विष्णू, आणि श्रीकृष्णाची सुंदर शिल्पे कोरलेली दिसतात. याशिवाय मंदिर परिसरात गणेश, शिव पार्वती, विष्णू दशावतार यांच्या सुबक मूर्तींचेही दर्शन होते.
लेबल्स
औरंगाबाद जिल्हा,
औरंगाबाद शहर,
खंडोबा,
देऊळ,
मंदिर,
स्थापत्य
Saturday, November 26, 2016
गिरिभ्रमण [मानमोडी पूर्वेकडून]
कालचा दुधारीचा ट्रेक करताना दूरवर
मनमोडीचा डोंगर नजरेस पडला. तेव्हाच उद्या मानमोडीचा ट्रेक करायचे ठरविले.
नियोजित वेळेप्रमाणे सकाळी खानापूर-धामनखेल च्या रस्त्याने गाडी पळवत नेली.
सातवाहनांच्या लेण्यांमुळे हा डोंगर परिचित होताच, पण ह्या पर्वताच्या
टोकावर दोन मंदिरांचे दर्शन झाले होते. त्यामुळे पुन्हा मानमोडीच्या दिशेने
मोर्चा वळवला होता.
पायथ्याशी वैभव वर्पे यांची गाठ पडली व त्यांच्या रूपाने नवा गिरीमित्र अन वाटाड्या भेटला. छोटयाश्या जंगलातून वाट काढत पठारावर पोहोचलो. पूर्ण माळरानच ते. पुढची वाटचाल करताना टोकावरचे खंडोबा मंदिर दृष्टीस पडले. आजूबाजूचा परिसर धुक्याच्या लोळात अंधुक दिसत होता. त्याच धुक्यात सूर्यदेवही अगदीच अंधुक दिसू लागले होते. मंदिरापाशी पोहोचलो तेव्हा साडेसात वाजून गेले तरी पहाटे सहाचा अनुभव येत होता. या ठिकाणावरून मानमोडी डोंगराची लांबी, रुंदी अन उंची पूर्णपणे कळते. लेण्यांचे दर्शन मात्र होत नाही. दूरवर याच डोंगरकपारीत असणाऱ्या सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन झाले तेव्हा उद्याचा बेत ठरला होता...
हजारो वर्षांपासून अंगाखांद्यावर लेण्या घेऊन इतिहासाची साक्ष देणाऱ्या या डोंगराचा पूर्वेकडून केलेला छोटेखानी ट्रेकही तितकाच रिफ्रेशिंग होता.

जुन्नर तालुका,
पर्वत,
पुणे जिल्हा,
मंदिर,
मानमोडी
Subscribe to:
Posts (Atom)