औरंगाबादच्या सातारा परिसरातील पेशवेकालीन हे आहे खंडोबा मंदिर. मराठा वास्तुशैलीतील हे मंदिर पूर्णतः विटांनी बांधलेले आहे. बीड बायपास रस्त्यावरून एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयापासून एक रस्ता थेट सातारा गावात येतो. याच रस्त्यावर सदर मंदिर बांधले आहे. मंदिर परिसर गर्भगृह, सभामंडप व मुख्य प्रवेशद्वार यात विभागलेला आहे. अर्धमंडपाच्या वरच्या भागात गजलक्ष्मी, शेषशायी विष्णू, आणि श्रीकृष्णाची सुंदर शिल्पे कोरलेली दिसतात. याशिवाय मंदिर परिसरात गणेश, शिव पार्वती, विष्णू दशावतार यांच्या सुबक मूर्तींचेही दर्शन होते.
माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...
Showing posts with label औरंगाबाद जिल्हा. Show all posts
Showing posts with label औरंगाबाद जिल्हा. Show all posts
Thursday, March 21, 2019
Sunday, January 20, 2019
'वन ट्री हिल', औरंगाबाद
सातारा हा औरंगाबाद मनपाच्या एका टोकाला येणारा परिसर. पेशवेकालीन खंडोबा मंदिरासाठी तो प्रसिद्ध आहे. याच साताऱ्यातील ही टेकडी- 'वन ट्री हिल'. सुरुवातीला नाव थोडं विचित्र वाटलं. पण, गुगलवर हेच नाव दिलय. लांबून पाहिल्यास या टेकडीच्या माथ्यावर एकच झाड शोभून दिसते त्यामुळेच हौशी लोकांनी त्याला 'वन ट्री हील' म्हटले असावे. औरंगाबादेत बऱ्याच डोंगरांना लेण्या आहेत, तसेच एक लेणे याही डोंगरालाही पाहायला मिळते. एका झाडाव्यतिरिक्त या ठिकाणचा माथा पूर्णतः सपाट आहे. पण, शहराचे संपूर्ण रूप येथून पाहता येते. चढाई फक्त पंधरा मिनिटांची! सध्या या टेकडीवर झाडे लावण्याचा उपक्रम केला गेलाय. अर्थात टेकडीला मल्टी-ट्री हिल बनवलं जातंय. परंतु, यंदाच्या दुष्काळी उन्हाळ्यात तो कितपत यशस्वी यात शंकाच आहे.
लेबल्स
औरंगाबाद,
औरंगाबाद जिल्हा,
टेकडी,
डोंगर
Wednesday, August 29, 2018
महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान : किल्ले देवगिरी
महाराष्ट्राच्या
इतिहासातील एक सुवर्णपान औरंगाबादच्या देवगिरी किल्ल्याच्या इतिहासाने
लिहिलं गेलंय. आज आपल्या राज्यात बऱ्यापैकी सुस्थितीत असलेला
हा एक दुर्ग... किल्ला कसा असावा, याचे एक उत्तम उदाहरण म्हणून देवगिरी
किल्ल्याकडे पाहता येईल. आठशे वर्षे अन अनेक लढाया पाहिलेल्या ह्या
छोटेखानी दुर्गात अनेक रहस्ये दडली आहेत! परकीय आक्रमकांनी या किल्ल्याचे
नाव कालांतराने बदलल्याने सध्या तो बहुतांशी त्याच नावाने ओळखला जातो.
नाशिकहून पहिल्यांदा औरंगाबादला आलो तेव्हा प्रथमच हा दुर्ग नजरेस पडला होता. तेव्हा देवगिरी किल्ला हाच, याची माहिती मात्र नव्हती. कालांतराने गेल्या चार-पाच वर्षांत त्याबद्दलचे आकर्षण अधिकच वाढले. या काळात त्याचे जसे वर्णन ऐकले होते तसाच हा किल्ला आहे. इतिहास डोळ्यासमोर ठेवून तो एक किल्ला म्हणून पहिला तर अधिकच भावतो. कधी औरंगाबादला गेलात तर देवगिरी किल्ला नक्की पाहा... स्वच्छ नजरेने!
नाशिकहून पहिल्यांदा औरंगाबादला आलो तेव्हा प्रथमच हा दुर्ग नजरेस पडला होता. तेव्हा देवगिरी किल्ला हाच, याची माहिती मात्र नव्हती. कालांतराने गेल्या चार-पाच वर्षांत त्याबद्दलचे आकर्षण अधिकच वाढले. या काळात त्याचे जसे वर्णन ऐकले होते तसाच हा किल्ला आहे. इतिहास डोळ्यासमोर ठेवून तो एक किल्ला म्हणून पहिला तर अधिकच भावतो. कधी औरंगाबादला गेलात तर देवगिरी किल्ला नक्की पाहा... स्वच्छ नजरेने!
लेबल्स
औरंगाबाद जिल्हा,
किल्ला,
देवगिरी,
दौलताबाद,
मुघल
Subscribe to:
Posts (Atom)

































