कवी केशवसुत हे मराठीतील एक उच्च प्रतिभा लाभलेले कवी. त्यांचे जन्मस्थान
कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड या गावी आहे. याच ठिकाणी कोकण
मराठी साहित्य परिषदेने त्यांचे स्मारक बनवले आहे. अगदी शंभर वर्षानंतर
सुद्धा आजही हे घर जसेच्या तसे असल्याचे दिसते. टिपिकल कोकणी पद्धतीच्या अन
नारळाच्या झाडांनी वेढलेल्या या घराच्या मागच्या बाजूला मराठीतल्या अनेक
कवींचे रेखाचित्र असलेले एक संग्रहालय आहे. मराठी सारस्वतांची मांदियाळी या
संग्रहालयात दिसते. ही उच्च प्रतीची रेखाचित्रे पाहताना मराठीला समृद्ध
करणाऱ्या कवींना मनोमन प्रणाम करावासा वाटतो.
माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...
Showing posts with label मालगुंड. Show all posts
Showing posts with label मालगुंड. Show all posts
Friday, March 15, 2019
Subscribe to:
Posts (Atom)




















































