ऋतू कुठलाही असो,
जुन्नरच्या निसर्ग सौंदर्यात तो अधिक भरच घालत असतो. त्यामुळे जुन्नरात
कुठेही जा आपल्या कॅमेऱ्यात इथले निसर्ग सौंदर्य कैद करण्याचा मोह कधीच
आवरत नाही. डोंगर टेकड्यांवर गेल्यास तिथून दोन गोष्टी मी न्याहाळण्याचा
यत्न करतो पहिला म्हणजे शिवनेरी किल्ला अन दुसरे इथले उंच शिखर ढाकोबा....
या ठिकाणावरूनही दोहोंचे तसेच लेण्याद्रीचा टेकड्यांचे मनोहारी दर्शन झाले.
रखरखत्या उन्हातही जुन्नरची पहारेदार असणारी शिखरे अन किल्ले अढळतेचा
संदेश देत असलेली दिसतात... #junnar #maharashtra #forts #nature #summer
#india
माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...
Showing posts with label शिरोली. Show all posts
Showing posts with label शिरोली. Show all posts
Saturday, April 14, 2018
Sunday, November 20, 2016
गिरिभ्रमण [दुधारी पर्वत]
तब्बल दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आलेला गिरिभ्रमणाचा योग...
छोटा पण ताजातवाना....
मायभूमी जुन्नरच्या सानिध्यात...
चहूबाजूंनी गिरिदुर्गांनी वेढलेल्या भूमीत गिर्यारोहणाची मजाच काही औरच असते...
पहाटेचा उत्साह अन गुलाबी थंडीतला रिफ्रेशिंग अनुभव...
धुक्याच्या दुलईत दूरवर दिसणारी खेडी, धरणांचा शांत व शीतल विस्तृत जलाशय...
शिवनेरी ते नारायणगड... हटकेश्वर, लेण्याद्रीच्या सुलेमान टेकड्या अन मानमोडीचा डोंगर...
सर्वच हा उत्साह ताजातवाना करणारं... पुन्हा नव्या जोमाने गिरिशिखरे पादाक्रांत करण्यासाठी... प्रोत्साहित करणारं...
विलक्षण अन विलोभनीय...

लेबल्स
जुन्नर तालुका,
टेकडी,
डोंगर,
दुधारी डोंगर,
पर्वत,
पुणे जिल्हा,
शिरोली
Subscribe to:
Posts (Atom)