आजवर जितक्या वेळा कोल्हापुरामध्ये आलो त्या प्रत्येक वेळेस रंकाळा तलाव मी पाहिलेला आहे. यंदा पहिल्यांदाच वर्षा ऋतूमध्ये हा तलाव अनुभवयास मिळाला. यंदा देखील कोल्हापुरात वर्षावृष्टी चांगली झाल्याने तलावात बऱ्यापैकी पाणी जमा झाले होते. इथे नियमित दिसणारी बदके पाण्यावर पोहण्याचा मनमुराद आनंद घेताना दिसली. शिवाय काहीसे मंद वारे चालू असल्याने समुद्रासारख्या लाटा देखील तयार होताना दिसत होत्या. शहरातल्या लोकांना समुद्राचा अनुभव असेच शहरी तलाव देत असतात. रंकाळा देखील त्याला अपवाद नव्हता.
No comments:
Post a Comment