गुहागरच्या एका सहलीमध्ये वेळणेश्वराला जाण्याचा पहिल्यांदा योग आला. गुहागरपासून अगदी थोड्याच अंतरावर वेळानेश्वराचे हे मंदिर अरबी समुद्रकिनाऱ्यावर वसलेले आहे. कोकणातील अन्य मंदिरांच्या रंगीबेरंगी शैली प्रमाणेच वेळणेश्वर मंदिराची रचना दिसून येते. मंदिराच्या मागच्याच बाजूला समुद्रकिनारा आहे.
रणरणत्या उन्हामध्येया मंदिरात सर्वप्रथम प्रवेश केला होता. त्या दिवशी समुद्र देखील शांत होता. किनाऱ्यावर चिटपाखरू देखील नव्हते. दुसऱ्यांदा जेव्हा या ठिकाणी आलो तेव्हा पावसाळा ऋतू चालू होता. खरंतर वेळानेश्वर हे कोकणातील सहलीचे ठिकाण. परंतु पावसाळ्यातील त्यादिवशी आम्हाला इथे राहण्यासाठी हॉटेल मिळवायला बराच त्रास झाला होता. अनेक ठिकाणी शोधले परंतु मनासारखी राहण्याची जागा मिळाली नाही. विशेष म्हणजे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रिसॉर्ट्स देखील या ठिकाणी आहेत. परंतु ती देखील सुस्थितीमध्ये नव्हती. याच कारणास्तव आम्ही गणपतीपुळेला जाण्याचा विचार केला. आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.
No comments:
Post a Comment